Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनालीने दिल्या रिंकूला परीक्षेसाठी शुभेच्छा

By admin | Updated: January 9, 2017 05:42 IST

रिं कू राजगुुरू ही ‘सैराट’ या सिनेमाच्या यशानंतर रातोरात स्टार झाली. सर्वसामान्य प्रेक्षकच काय तर ती मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचीदेखील फेव्हरेट बनली.

रिं कू राजगुुरू ही ‘सैराट’ या सिनेमाच्या यशानंतर रातोरात स्टार झाली. सर्वसामान्य प्रेक्षकच काय तर ती मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचीदेखील फेव्हरेट बनली. आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने रिंकूला परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सैराट चित्रपटाचे तिने आॅडिशन दिले तेव्हा ती सातवी इयत्तेत होती. हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा ती नववीमध्ये होती. सध्या ती दहावीच्या परीक्षेचा अभ्यास करीत आहे. सोनालीने रिंकूसोबत एक झक्कास फोटो काढला आणि तिला दहावीच्या परीक्षेसाठी ‘बेस्ट आॅफ लक’ देखील दिले आहे. रिंकू जरी आता दहावीत असली तरी ती शाळेत जात नाही. तिने शाळा जरी सोडली असली तरी ती बाहेरून बोर्डाची परीक्षा देणार आहे. परीक्षा संपली की आपल्याला ही ‘सैराट गर्ल’ पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये दिसू शकते. कन्नड भाषेत ‘सैराट’चा रिमेक होत असल्याने देखील बरीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील काही सीन आणि पोस्टर नुकतेच सोशल साईट्सवर रिलीज झाले आहेत. सध्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या ‘आर्ची’ला तिचे चाहते नक्कीच ‘सैराटमय शुभेच्छा’ देतील यात काही शंकाच नाही.