सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरच्या माध्यमातून सोनाली कुलकर्णी नेहमी आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. नुकतेच ट्विटरवर सोनालीच्या फॉलोअर्सची संख्या 40 हजारांवर गेली आहे. रसिकांचे एवढे प्रेम पाहून सोनाली कुलकर्णी भारावून गेली आहे. फॉलोअर्सचा हा टप्पा पार केल्यानंतर फॅन्सकडूनही तिच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. काही महिन्यांपूर्वी तिचे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाइड करण्यात आले होते. सोनाली कुलकर्णीच्या नावाने अनेक अकाऊंट असल्यामुळे सगळ्यांची खातरजमा करुन ट्विटरने काही महिन्यांपूर्वी सोनाली कुलकर्णी ट्विटर अधिकृत असल्याचे जाहीर केले होते. यानंतर आपल्या लाडक्या अभिनेत्रीशी थेट संवाद साधण्यासाठी सोनालीच्या या ट्विटर हँडलवरील फँन्सची संख्या झपाटयाने वाढत चालली आहे. आता तर फॉलोअर्सची संख्या चाळीस हजाराच्यावर गेल्याने सध्या ती सातवे आसमान पर आहे.
फॉलोअर्सच्या संख्येमुळे सोनाली भारावली
By admin | Updated: March 4, 2017 02:24 IST