Join us  

Sonali Bendre : सोनाली बेंद्रेच्या हँडसम लेकाच्या प्रेमात पडल्या तरुणी; पर्सनॅलिटी पाहून लोक म्हणाले, "हिरो बनवा"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 2:56 PM

Sonali Bendre : सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बहल यांना रणवीर बहल नावाचा एक हँडसम मुलगाही आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आजही तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सोनाली बेंद्रे आता चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर ती एक्टिव्ह असलेली पाहायला मिळते. सोनाली बेंद्रेचं सौंदर्य पाहून पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरही तिच्यावर फिदा झाला होता. 

सोनालीने गोल्डी बहलशी लग्न केलं असून आता ती आनंदी जीवन जगत आहे. सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बहल यांना रणवीर बहल नावाचा एक हँडसम मुलगाही आहे. सोनाली बेंद्रे तिचा मुलगा रणवीरसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. सोनालीचा मुलगा रणवीर मोठा झाला असून रणवीरला पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की ही अभिनेत्री एवढ्या मोठ्या मुलाची आई आहे. 

सोनालीने गेल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर मुलगा रणवीरसोबतचा फॅमिली फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सोनाली, गोल्डी आणि रणवीर शाही स्टाईलमध्ये कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसले. जेव्हा हा फोटो समोर आले तेव्हा सोनालीचा मुलगा रणवीरला पाहून लोक आश्चर्यचकित झाले. अनेक तरुणी सोनालीच्या हँडसम लेकाच्या प्रेमात पडल्या.

सोनाली बेंद्रेच्या या पोस्टवर चाहत्यांनी अनेक रिएक्शन्स दिल्या. पर्सनॅलिटी पाहून लोक म्हणाले, "याला हिरो बनवा." पोस्टवर कमेंट करताना एका सोशल मीडिया युजरने लिहिलं की, 'मुलगा खूप मोठा झाला आहे. आम्हाला माहीतही नव्हते'. तर दुसऱ्याने लिहिले, 'परफेक्ट फॅमिली पिक्चर'. तर दुसऱ्या युजरने लिहिले, 'ओएमजी रणवीर! हे कधी घडलं'. एवढेच नाही तर लोकांनी हार्ट इमोजी बनवून पोस्टवर भरभरून प्रेमही केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :सोनाली बेंद्रेबॉलिवूड