Join us

आता लसीकरण सगळ्यांसाठी सुरू व्हायला हवं, असे म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केला हा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 17:10 IST

सर्व वयोगटातील लोकांना लस देण्यात यावी असे मत अनेक सामान्य लोकांचे आहे. त्याचसोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील ही विनंती केली आहे.

ठळक मुद्देसोनालीने सोशल मीडियावर नुकताच तिच्या आईवडिलांचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, माझ्या आई बाबांचं लसीकरण झालंय...

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव सगळीकडे वाढला आहे. महाराष्ट्रात 45 वर्षांहून अधिक लोकांना सध्या कोरोनाची लस दिली जात आहे. कोरोनाची लस 25 वर्षांहून अधिक लोकांना देण्याची परवानगी द्यावी यासाठी नुकतेच राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पत्र पाठवले आहे.

सर्व वयोगटातील लोकांना लस देण्यात यावी असे मत अनेक सामान्य लोकांचे आहे. त्याचसोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील ही विनंती केली आहे. सोनालीने सोशल मीडियावर नुकताच तिच्या आईवडिलांचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, माझ्या आई बाबांचं लसीकरण झालंय... लॉकडाऊन होईल किंवा होणारही नाही, ते आपल्या हातात नाही. पण आपली सुरक्षितता ही केवळ आपली जबाबदारी आहे. काळजी घेऊयात, आपली आणि आपल्या कुटुंबाची... आता लसीकरण सरसकट सगळ्यांसाठी सुरू व्हायला हवं हीच विनंती... 

सोनालीने ही विनंती करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे. सोनालीचे हे मत योग्य असल्याचे तिचे चाहते कमेंटद्वारे सांगत आहेत. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. केवळ पाच तासांत 19 हजाराहून अधिक लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे.  

टॅग्स :सोनाली कुलकर्णी