Join us

सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बालने दिली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 09:26 IST

सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल या जोडप्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Sonakshi Sinha- Zaheer Iqbal Buy New Car: सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. लवकरच येत्या जूनमध्ये ती पती जहीर इक्बालसोबत लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहे. पण, त्याआधीच या जोडप्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. एक नवीन आलिशान कार खरेदी केली आहे. 

सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती जहीर इक्बाल यांनी  एक नवीकोरी बीएमडब्ल्यूकार खरेदी केली आहे. जहीर इक्बालने इंस्टाग्रामवर त्यांच्या नवीन कारचा एक फोटोही शेअर केला आहे. यासोबतच जहीरने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "मी माझी नवीन कार चालवण्यास खूप उत्सुक आहे". त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी  प्रतिक्रिया देत शुभेच्छांचा वर्षाव केलाय.  सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांची नवीन बीएमडब्ल्यू कार एक्स५ किंवा एक्स३ सीरिजमधील असून या गाडीची  ९० लाख ते १.३७ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. 

सोनाक्षी सिन्हाने गेल्या वर्षी २३ जून रोजी जहीरसोबत तिच्या मुंबईतील घरी कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीनं लग्न केलं होतं. लग्नानंतर या जोडप्याने  एक भव्य रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. लग्न करण्यापूर्वी सोनाक्षी आणि झहीर यांनी सात वर्षे एकमेकांना डेट केलं. दोघांनी २०२२ मध्ये डबल एक्सएल चित्रपटातही एकत्र काम केलं आहे.

सोनाक्षी सिन्हा वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच लवकरच 'जटाधारा' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. सोनाक्षी सिन्हा शेवटची संजय लीला भन्साळीच्या नेटफ्लिक्सवर प्रर्दशित झालेल्या 'हीरामंडी'मध्ये दिसली होती. 

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाकारबीएमडब्ल्यू