Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sonakshi Sinha Wedding : हनी सिंगला मिळालं सोनाक्षीच्या लग्नाचं आमंत्रण, म्हणतो- "जहीर आणि ती..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 17:30 IST

सोनाक्षी आणि जहीर यांच्या लग्नात बॉलिवूड सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत. पूनम ढिल्लोनंतर आता यो यो हनी सिंगला सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाचं निमंत्रण मिळालं आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची लगीनघाई सुरू आहे. सोनाक्षी बॉयफ्रेंड हहीर इक्बालसोबत लग्नबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. सोनाक्षी आणि जहीर २३ जूनला मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत सात फेरे घेणार आहेत. सोनाक्षी आणि जहीर यांच्या लग्नात बॉलिवूड सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत. पूनम ढिल्लोनंतर आता यो यो हनी सिंगला सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाचं निमंत्रण मिळालं आहे. 

सोनाक्षीच्या लग्नाचं आमंत्रण मिळाल्यानंतर हनी सिंग खूश झाला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. "सध्या मी लंडनमध्ये ग्लोरीच्या पहिल्या गाण्याचं शूटिंग करत आहे. पण, मी माझी बेस्टफ्रेंड सोनाक्षीच्या लग्नासाठी नक्कीच वेळ काढेन. माझ्या करिअरमध्ये तिचा मोलाचा वाटा आहे. तिने अनेक वेळा मला मदत केली आहे. सोनाक्षी आणि जहीर या पावर कपलला शुभेच्छा. भोलेनाथ त्यांना आशीर्वाद देवो", असं त्याने स्टोरीमध्ये म्हटलं आहे. 

सोनाक्षीने हनी सिंहच्या म्युझिक अल्बमध्ये काम केलं आहे. हनी सिंहची 'देसी कलाकार' आणि 'कलास्टार' ही गाणी प्रचंड गाजली. या गाण्यात सोनाक्षी दिसली होती. आता अभिनेत्रीच्या लग्नासाठी हनी सिंग उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, सोनाक्षी आणि जहीर गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे फोटोही शेअर करताना दिसायचे. आता लग्नबंधनात अडकून ते त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात करत आहेत. सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाची ऑडिओ पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.  

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाहनी सिंहजहीर इक्बालसेलिब्रेटी वेडिंग