Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षीला मल्लिकाजान मनिषा कोईरालाकडून मिळालं लग्नाचं खास गिफ्ट, व्हिडिओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 10:07 IST

लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीरचं मुंबईत वेडिंग रिसेप्शन असणार आहे. यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहेत. लग्नाआधीच सोनाक्षीला अभिनेत्री मनिषा कोईरालाकडून खास गिफ्ट मिळालं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बला आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सोनाक्षी आणि जहीर लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. कोर्ट मॅरेज पद्धतीने ते दोघे लग्न करणार आहेत. कुटुंबीय आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि जहीरचा लग्नसोहळा पार पडणार आहे. सोनाक्षीच्या घरीदेखील लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. 

लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीरचं मुंबईत वेडिंग रिसेप्शन असणार आहे. यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहेत. लग्नाआधीच सोनाक्षीला अभिनेत्री मनिषा कोईरालाकडून खास गिफ्ट मिळालं आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी(२२ जून) मनिषा कोईरालाने सोनाक्षीच्या घरी तिच्या लग्नाचं खास गिफ्ट पाठवलं आहे. याचा व्हिडिओ फिल्मीग्यान या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत मनिषाचं गिफ्ट घेऊन एक व्यक्ती सोनाक्षीच्या रामायणा या निवासस्थानी आल्याचं पाहायला मिळत आहे.  सोनाक्षी आणि मनिषाने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'हिरामंडी' वेब सीरिजमध्ये एकत्र काम केलं आहे. यामध्ये मनिषाने मल्लिकाजान तर सोनाक्षीने फरीदान ही भूमिका साकारली आहे. 

दरम्यान, एकुलत्या एक मुलीच्या लग्नासाठी शत्रुघ्न सिन्हा यांचं घर सजलं आहे. रामायणाला खास विद्युत रोषषाई करण्यात आली आहे. सोनाक्षीच्या लग्नापूर्वीच्या विधींनाही सुरुवात झाली आहे. तिच्या हातावर जहीर इक्बालच्या नावाची मेहेंदी रंगली आहे. सिन्हा कुटुंबीयांकडून लाडक्या लेकीच्या लग्नाअगोदर खास पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. सोनाक्षी आणि सिन्हा कुटुंबीयांबरोबर ही पूजा पार पडली. 

सोनाक्षी आणि जहीर गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता त्यांनी लग्न करून आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. सोनाक्षी आणि जहीर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आज रजिस्टर मॅरेज करणार आहेत. त्यानंतर रिसेप्शन पार्टी दिली जाणार आहे. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनला बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही हजर राहणार आहेत. 

टॅग्स :सोनाक्षी सिन्हासेलिब्रेटी वेडिंगमनिषा कोईराला