Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षी सिन्हा सलमान खानच्या कुटुंबातील या व्यक्तीसोबत होती अनेक वर्षं नात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 14:53 IST

सोनाक्षी आणि सलमानच्या कुटुंबियांचे खूप वर्षांपासून चांगले संबंध आहेत. तुम्हाला माहीत आहे का, सोनाक्षीचे सलमानच्या कुटुंबामधील एका व्यक्तीसोबत अनेक वर्षं अफेअर होते.

ठळक मुद्देसलमानने काही वर्षांपूर्वी सोनाक्षीला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. सलमानच्या या सल्लयानंतर सोनाक्षी कामी लागली आणि स्वीमिंग व योगाद्वारे तिने तिचे तब्बल ३० किलो वजन कमी केले.

बॉलिवूडची ‘दबंग’ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा आज (२ जून) वाढदिवस. २ जून १९८७ रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे सोनाक्षीचा जन्म झाला. शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांची सोनाक्षी मुलगी असून तिने फॅशन डिझाईनिंगमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

सोनाक्षीने अभिनेत्री म्हणून नाही तर कॉस्च्यूम डिझाईनर म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. ‘मेरा दिल लेकर देखो’ या २००५ मध्ये आलेल्या चित्रपटासाठी तिने कॉस्च्युम डिझाईनर म्हणून काम केले. यानंतर पाच वर्षांनी म्हणजे २०१० मध्ये तिने बॉलिवूड डेब्यू केला. सलमान खानच्या अपोझिट ‘दबंग’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. यातील सोनाक्षीच्या अभिनयाची चांगलीच प्रशंसा झाली आणि मग सोनाक्षीने कधीच मागे वळून पाहिले नाही. चित्रपटात येण्यापूर्वी सोनाक्षीने मॉडेलिंग केली.

सोनाक्षी आणि सलमानच्या कुटुंबियांचे खूप वर्षांपासून चांगले संबंध आहेत. तुम्हाला माहीत आहे का, सोनाक्षीचे सलमानच्या कुटुंबामधील एका व्यक्तीसोबत अनेक वर्षं अफेअर होते. सोनाक्षी सलमानचा लहान भाऊ सोहेल खानची पत्नी सीमा खानच्या भावासोबत नात्यात होती. सीमाच्या भावाचे नाव बंटी सचदेवसोबत ती अनेक वर्षं रिलेशनशिपमध्ये होती. त्यांच्या दोघांच्या नात्याची मीडियात चांगलीच चर्चा देखील झाली होती.

सलमानने काही वर्षांपूर्वी सोनाक्षीला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. सलमानच्या या सल्लयानंतर सोनाक्षी कामी लागली आणि स्वीमिंग व योगाद्वारे तिने तिचे तब्बल ३० किलो वजन कमी केले. यानंतर ती सलमानची हिरोईन म्हणून बॉलिवूडमध्ये आली. ‘दबंग’साठी मिळालेले पहिले मानधन तिने सलमानच्याच ‘बीईंग ह्युमन’ या एनजीओला दान केले होते.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हा