Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षीला पुरस्कार न मिळाल्याने मोटवानी दु:खी

By admin | Updated: August 6, 2014 00:59 IST

प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांना सोनाक्षी सिन्हाला ‘लुटेरा’ या चित्रपटासाठी एकही पुरस्कार न मिळाल्याचे दु:ख आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांना सोनाक्षी सिन्हाला ‘लुटेरा’ या चित्रपटासाठी एकही पुरस्कार न मिळाल्याचे दु:ख आहे. मागील वर्षी त्यांनी सोनाक्षीसोबत ‘लुटेरा’ हा चित्रपट बनवला होता. प्रेक्षकांसह समीक्षकांनीही या चित्रपटाची प्रशंसा केली होती. मोटवानी म्हणाले, ‘माङयासाठी ‘लुटेरा’ एक शिकवण देणारा अनुभव ठरला. चित्रपट बनवण्यासाठी लागलेला खर्च वसूल करता आला; पण चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. पुरस्कारांचे विचाराल, तर मला सोनाक्षीबद्दल वाईट वाटत आहे, कारण तिने या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला होता, ती त्यासाठी पुरस्कारास पात्र होती.’ सोनाक्षी सिन्हा आणि रणवीर सिंह यांची मुख्य भूमिका असलेला ‘लुटेरा’ हा चित्रपट 195क् च्या दशकातील कथेवर आधारित होता.