Join us

सोनाक्षीचा लूक झाला ‘व्हायरल’

By admin | Updated: October 13, 2014 03:15 IST

रुपेरी पडद्यावर साडी, सलवारसारख्या परंपरागत पोशाखात दिसणाऱ्या सोनाक्षी सिन्हाने आता आधुनिक वस्त्रांकडे आपला मोर्चा वळविला आहे

रुपेरी पडद्यावर साडी, सलवारसारख्या परंपरागत पोशाखात दिसणाऱ्या सोनाक्षी सिन्हाने आता आधुनिक वस्त्रांकडे आपला मोर्चा वळविला आहे. ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’ या आगामी चित्रपटातील आपला लूक सोनाक्षीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. निळा शॉर्ट ड्रेस, हातात ब्रेसलेट, कमरेला बांधलेले जॅकीट, डोक्यावर काऊबॉय हॅट आणि पायात बूट, अशा वेशभूषेतील सोनाक्षी बोल्डदेखील दिसत आहे. ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’मधील माझा हा लूक आवडला का?’ अशी विचारणा करून सोनाक्षीने चाहत्यांची मतेदेखील मागविली आहेत. फेसबुकवरील सोनाक्षीच्या या फोटोला चार तासांत तीन लाखांपेक्षा जास्त ‘लाईक’ मिळाले, तर अडीच हजार लोकांनी त्याला ‘शेअर’ केले. ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’चे बहुतांश शूटिंग आॅस्ट्रियात झाले. अजय देवगण आणि प्रभू देवा यांनी पहिल्यांदाच या चित्रपटासाठी एकत्र नृत्य केले आहे. यामी गौतम, कुणाल रॉय कपूर, रॉकी वर्मा यांच्याही यात भूमिका आहेत.