Join us

‘लिंगा’च्या निर्मात्यांवर सोनाक्षी नाराज

By admin | Updated: August 25, 2014 04:52 IST

सध्या सोनाक्षी सिन्हा साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या सोबत ‘लिंगा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे;

सध्या सोनाक्षी सिन्हा साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या सोबत ‘लिंगा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे; पण शूटिंगदरम्यान तिला काही समस्यांना तोंड द्यावे लागल्याची बातमी आहे. सध्या चित्रपटाचे शूटिंग जोग फॉल्सजवळ सुरू आहे. स्टारकास्टची राहण्याची सोय या ठिकाणापासून जवळ असलेल्या हॉटेलमध्ये करण्यात आली आहे; पण या हॉटेलचे मॅनेजमेंट सोनाक्षीला आवडलेले नाही. त्यामुळेच तिने सोशल नेटवर्किंग साईट टिष्ट्वटरवर तिचा राग व्यक्त केला आहे. सोनाक्षीने लिहिले की, ‘देवा मी असे काय वाईट केले की, त्यामुळे तू एका अत्यंत वाईट हॉटेलचा माझ्यासाठी शोध घेतलास.’ सोनाक्षीने तिचा राग व्यक्त केला खरा; पण पुढे तिला वाटले की, यामुळे नव्या वादाला तोंड फुटू शकते. त्यामुळे थोड्याच वेळाने तिने ही पोस्ट डिलीट केली. युनिट मेंबर्सनुसार सोनाक्षी निर्मात्यांवर नाराज आहे. त्यांनी कलाकारांच्या राहण्याची सोय चांगली केली नसल्याची तिची तक्रार आहे.