Join us

सोहाचा लग्नसोहळा साधाच!

By admin | Updated: January 22, 2015 23:38 IST

इंडस्ट्रीत अभिनयापेक्षा शर्मिला टागोरची मुलगी आणि सैफ अली खानची बहीण अशीच ओळख सोहाने निर्माण केली आहे

इंडस्ट्रीत अभिनयापेक्षा शर्मिला टागोरची मुलगी आणि सैफ अली खानची बहीण अशीच ओळख सोहाने निर्माण केली आहे. तर तिचा प्रियकर कुणाल खेमूनेही फारशी प्रगती केलेली नाही. गेली काही वर्षे सैफीनाप्रमाणेच हे दोघेही ‘लिव्ह-इन’मध्ये राहत होते. गेल्या वर्षी त्यांनी साखरपुडाही उरकला. आता येत्या २५ जानेवारीला दोघे लग्न करणार आहेत; आणि हे लग्न घरीच अगदी साधेपणाने होणार आहे. या जोडप्याला शर्मिला टागोर यांनी मुंबईत ९ कोटींचा फ्लॅट भेट दिला आहे.