Join us

‘घायल’च्या सिक्वलमध्ये सोहा

By admin | Updated: December 18, 2014 00:33 IST

सनी देओलची मुख्य भूमिका असलेल्या ‘घायल’ या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये सोहा अली खानला साईन करण्यात आले आहे

सनी देओलची मुख्य भूमिका असलेल्या ‘घायल’ या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये सोहा अली खानला साईन करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सनी देओल करणार असून, त्याची या चित्रपटात मुख्य भूमिकाही आहे. घायल जेथे संपतो, तेथूनच घायल रिटर्न्सची कथा सुरू होते. त्यामुळे सोहा या चित्रपटात मीनाक्षी शेषाद्रीची भूमिका निभाविणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सोहानेही या चित्रपटात काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या चित्रपटात नायिका असल्याचे तिने म्हटले आहे. घायल रिटर्न्स सुरू होण्यासाठी बरीच वर्षे लागली. त्यामुळे अनेकांना वाटले की, हा चित्रपट कधीच सुरू होणार नाही. सनीला मात्र कलाकारांना सोबत घेऊन धूमधडाक्याने या चित्रपटाची घोषणा करायची नव्हती. त्याला या चित्रपटाचे शांततेने शूटिंग करायचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.