Join us

...म्हणून चिराग निघाला रोड ट्रीपला

By admin | Updated: March 6, 2017 03:14 IST

अभिनेता चिराग पाटील सध्या रोड ट्रीप एन्जॉय करतोय

अभिनेता चिराग पाटील सध्या रोड ट्रीप एन्जॉय करतोय. होय, येत्या ९ मार्चला चिराग पाटीलचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पत्नी सनासह पंधरा दिवसांसाठी रोड ट्रिपला निघाला आहे. त्यासाठी तो सध्या शूटिंग करत असलेला ‘लव्ह बेटिंग’ या सिनेमाच्या शूटिंगमधूनही ब्रेक घेतला आहे. नैनीताल, उदयपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणांना तो सध्या भेट देत आहे. रोज कोणत्या शहराला त्याने भेट दिली? त्या ठिकाणाचे वैशिष्ट्य काय आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आणि त्याठिकाणाचे खास फोटोही तो सोशल मीडियावर अपलोड करत असतो. त्यामुळे त्याचा हा वाढदिवस त्याने अगदी हटके पद्धतीने सेलिब्रेट करायचे ठरवले असून, त्याचे वाढदिवसाचे प्रि-सेलिब्रेशन तो एन्जॉय करतोय. त्यामुळे आमच्याकडूनही चिरागला वाढदिवसाच्या शुभेच्छा!