Join us

तर मी त्रिशलाचे पायच तोडले असते - संजय दत्त

By admin | Updated: March 4, 2017 13:44 IST

त्रिशलाने अभिनेत्री बनण्याच निर्णय घेतला असता तर मी तिचे पायच तोडले असते असे धक्कादायक विधान संजय दत्तने केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - बेकायदेशीरित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी तुरूंगवासाची शिक्षा भोगून बाहेर आलेला अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला असून सध्या तो ' भूमी' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यामध्ये मोठी उत्सुकता असून आग्रा येथे झालेले शूटिंग पहायला मोठी गर्दीही झाली होती. या चित्रपटासंबंधी एका पत्रकार परिषदेचे दिल्लीत आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी संजयने चित्रपटासंबंधित तसेच त्याच्या ऑनस्क्रिन मुलीबद्दल म्हणजेच अदिती राव हैदरीबद्दल अनेक प्रश्नांचीही उत्तरे दिली.
 
याचवेळी त्याला त्याची खरी मुलगी त्रिशला बद्दलही प्रश्न विचारण्यात आले. त्रिशला आणि आदिती मध्ये काय साम्य आहे असे विचारण्यात आले असता संजू म्हणाला ' जर त्रिशालाने अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला असता तर मी तिचे पायच तोडले असते. पण, आदितीसोबत म्हणजेच माझ्या ऑनस्क्रिन मुलीसोबत मी असे काहीही करणार नाही.' त्याच्या या उत्तरामुळे सारेच भांबावले. आपल्या मुलांनी आपला अभिनयाचा वारसा पुढे चालवावा असे प्रत्येकाला वाटते, मात्र संजयला तसे वाटत नसल्याचे त्याच्या उत्तरावरून स्पष्ट झाले.