ऑनलाइन लोकमत
कराची, दि. 6 - शाहरुख खानचा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रईस या चित्रपटावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शाहरुखला जोरदार धक्का बसला आहे. रईसमध्ये मुस्लिम समाजाचे चुकीचे चित्रण झाले आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शाहरुखचे पाकिस्तानमधील चाहते या चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते, येथे रविवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण त्याआधी तीन दिवसांपूर्वीच पाकिस्तानी सेंसॉर बोर्डाच्या सूत्रांकडून रईसवर बंदी घालण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती. या निर्णयामध्ये पाकिस्तानी सुरक्षा संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होते, असेही पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमधील सूत्रांनी सांगितले होते. अखेर पाकिस्तानी सेसॉर बोर्डाने हा चित्रपट पाहिला आणि बरोबर तीन दिवसांनी त्यावर बंदी घातली.