Join us
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या कॅटरीनाचा शोध

By admin | Updated: August 15, 2014 23:54 IST

कॅटरीना कैफसारखा चेहरा असणाऱ्या १०-११ वर्षांच्या मुलीचा शोध गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे; पण अद्याप अशी मुलगी मिळालेली नाही.

कॅटरीना कैफसारखा चेहरा असणाऱ्या १०-११ वर्षांच्या मुलीचा शोध गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे; पण अद्याप अशी मुलगी मिळालेली नाही. अभिषेक कपूरच्या ‘फितूर’ या चित्रपटात कॅटरीना कैफच्या लहानपणीची भूमिका साकारण्यासाठी एका लहान मुलीचा शोध घेणे सुरू आहे. निर्माते गेल्या काही दिवसांपासून अशा मुलीच्या शोधात आहेत; पण कॅटरीनासारखी मुलगी त्यांना अद्याप भेटलेली नाही. चित्रपटातील अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या लहानपणीच्या भूमिकेसाठीही मुलांचे आॅडिशन्स घेण्यात येत आहेत. फितूर या चित्रपटात आदित्य- कॅटसह अभिनेत्री रेखाही आहेत.