Join us

सोनाक्षीची उडाली झोप

By admin | Updated: August 2, 2014 23:46 IST

एखाद्या प्रतिस्पर्धी हिरोईनने सोनाक्षी सिन्हाची झोप उडवली नसून एका स्टेज शोमुळे सोनाक्षीचे हे हाल झाले आहेत.

एखाद्या प्रतिस्पर्धी हिरोईनने सोनाक्षी सिन्हाची झोप उडवली नसून एका स्टेज शोमुळे सोनाक्षीचे हे हाल झाले आहेत. रविवारी लंडनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सोनाक्षीला परफॉर्म करायचे आहे. या परफर्ॉमसच्या उत्साहानेच तिची झोप उडाल्याचे कळते. आठवडाभरापूर्वीच सोनाक्षीने लंडनला जाण्याची तयारी करून ठेवली आहे. सूत्रंनुसार लंडन दौ:यात तिच्यासोबत शाहिद कपूरही असणार आहे, त्यामुळेही सोनाक्षीचा आनंद गगनात मावेनासा झालाय. त्यानिमित्ताने शाहिदसोबत काही वेळ घालवता येईल, या कल्पनेने सोनाक्षी खुश आहे. या कार्यक्रमात सोनाक्षी-शाहिदसह ज्ॉकलीन फर्नाडिस आणि अली जफरही परफॉर्म करणार आहेत.