Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियाने बनवले आकाश कंदील

By admin | Updated: October 31, 2016 02:25 IST

अभिनेत्री प्रिया मराठेने अनेक मालिका आणि चित्रपटातून तिच्या खलनायकी अंदाजाने प्रेक्षकांना नेहमीच खिळवून ठेवले होते.

अभिनेत्री प्रिया मराठेने अनेक मालिका आणि चित्रपटातून तिच्या खलनायकी अंदाजाने प्रेक्षकांना नेहमीच खिळवून ठेवले होते. रसिकांच्या लाडक्या प्रियाने दिवाळीसाठी खास आकाशकंदील बनवला आहे. या कंदिलाचे फोटो तिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रियाच्या चाहत्यांनी या फोटोला लाईक्स देत तिच्याकडे आकाशकंदिलाची बनवण्याची आॅर्डरही दिली आहे. याविषयी प्रियाने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले, ह्यह्यमला कंदील करायला फार आवडतात. मी लहानपणापासूनच घरात दर दिवाळीला कंदील बनवायचे. मला तेव्हा फार मजा यायची. पण आता शूटिंगच्या गडबडीमुळे या गोष्टी करायला फार वेळ मिळत नाही.ह्णह्ण यंदा मला या दिवाळीत छान वेळ मिळाल्याने मी घरीच कंदील करायचे ठरवले. मी दोन ते तीन कंदील या दिवाळीत तयार केलेत. त्यातील एक मी माझ्या माहेरी पाठवला एक सासरी आणि एक माझ्या घरी ठेवला. बाहेरच्या वस्तू विकत घेण्यापेक्षा घरात काही केले तर त्याचा जास्त आनंद मिळतो, असे प्रिया सांगते.