Sky Force Box Office Collection: अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'स्काय फोर्स' सिनेमातून सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहारियानं (Veer Pahariya) बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. या सिनेमानं दमदार ओपनिंगनंतर सिनेमानं बॉक्स ऑफिसवर पकड कायम ठेवली आहे. वीर पहारियाचा डेब्यू चित्रपट फ्लॉप होणार नाही, असं दिसतंय. तसंच अक्षय कुमारच्या करिअरमधला फ्लॉप सिनेमांची साखळी या सिनेमानं मोडली आहे.
'स्काय फोर्स' सिनेमा पाहण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी गर्दी केली. समीक्षकांकडून मिळालेली कौतुकाची थाप आणि रसिकांच्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे या चित्रपटाने पहिल्या वीकेंडलाच बाॅक्स ऑफिसवर ७३.२० कोटी रुपयांचा बिझनेस केला होता. सोमवारपासून व्यवसायात घट होऊनही पहिल्या आठवड्याअखेर हा चित्रपट १०० कोटी रुपयांच्या व्यवसायाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
१६० कोटी बजेट असलेल्या या 'स्काय फोर्स' सिनेमानं शुक्रवारी १५.३० कोटी, शनिवारी २६.३०, रविवारी ३१.६०, सोमवारी ८.१०, मंगळवारी ६.३०, बुधवारी ६.६० असा व्यवसाय करत पहिल्या आठवड्यात एकूण ९४.२० कोटी रुपये कमावले आहेत. शुक्रवारी तिकिटांवर सूट देण्यात आली नसती तर कदाचित बुधवारपर्यंतच हा चित्रपट १०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असता.
'स्काय फोर्स' सिनेमा १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धादरम्यान पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यावर आधारित आहे. दरम्यान वीर पहारिया हा संजय पहारिया आणि स्मृती शिंदे यांचा मुलगा आहे. स्मृती शिंदे या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. वीर हा सुशील कुमार शिंदेंचा नातू आहे.