Join us

अरे देवा, मलाकाने व्हिडीओ शेअर करताच तुफान झाला व्हायरल, 8 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आणि.......

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 17:01 IST

आतापर्यंत फिटनेस व्हिडीओ, कुकिंग व्हिडीओमुळे तिने सा-यांची वाहवा मिळवली आता नव्या व्हिडीओतू आणखीन खास टीप्स देत चर्चेत आली आहे.

छैय्या छैय्या गर्ल अभिनेत्री मलायका अरोराचे घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे ती रसिकांचे नेहमीच लक्ष वेधून घेत असते. सोशल मीडियावरही ती बरीच सक्रिय असते. आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिच्या वर्कआऊ व्हिडीओंना तर लाखांहून अधिक लोक पसंती देतात. 

आतापर्यंत फिटनेस व्हिडीओमुळे ती भरपूर चर्चेत राहिली. पण नुकतेच सोशल मीडियावर तिने जे काही शेअर केले त्यालाही  8 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले. असा काय खास होते व्हिडीओमध्ये की तो इतका हिट ठरतोय असा प्रश्न तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत फिटनेस व्हिडीओ, कुकिंग व्हिडीओमुळे तिने सा-यांची वाहवा मिळवली आता नव्या व्हिडीओतू आणखीन खास टीप्स देत चर्चेत आली आहे.

मलायकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने पाणी पिण्याची योग्य पद्धत  चाहत्यांना समजावून सांगितली आहे. मलायकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत व्हायरल झाला आहे.

टॅग्स :मलायका अरोरा