Join us

शाहरुखसाठी गायचेय गाणे

By admin | Updated: February 21, 2016 02:11 IST

लडकियों के दिल की धडकन.... किंग आॅफ रोमान्स... किंग खान अशी बिरुदे मिरवून, बॉलीवूडमध्ये बादशाही करणाऱ्या शाहरुख खानचे कितीतरी फॅन्स आहेत. अनेक हिरोईन्स

लडकियों के दिल की धडकन.... किंग आॅफ रोमान्स... किंग खान अशी बिरुदे मिरवून, बॉलीवूडमध्ये बादशाही करणाऱ्या शाहरुख खानचे कितीतरी फॅन्स आहेत. अनेक हिरोईन्स शाहरुखसोबत काम करण्यासाठी उत्सुक असतात, तर प्रत्येक गायकाला एक तरी गाणे आपण शाहरुखसाठी गावे, अशी इच्छा असते. अवधुत गुप्तेलादेखील असेच वाटते. त्याला शाहरुख खानसाठी गाणे गायचेय म्हणे. ‘मी शाहरुखचा खूप मोठा चाहता आहे आणि मला एकदा त्याच्यासाठी गाणे गायचा चान्स मिळावा,’अशीच अवधूतची इच्छा आहे. त्याने सोशल वेबसाइटवर असे लिहिले आहे की, शाहरुख मी तुझा खूप मोठा फॅन आहे आणि एक दिवस मला तुझ्यासाठी गायला नक्कीच आवडेल,’ असे त्याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच सांगितले. अवधूतची ही इच्छा लवकरच पूर्ण होवो. आता अवधूत शाहरुखसाठी कधी गातोय, याचीच आपण प्रतीक्षा करू या.