Join us

Sikandar Movie : सलमानच्या 'सिकंदर'चे शोज हाऊसफूल! अ‍ॅडव्हान्स बुकिंगला तुफान प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 16:09 IST

सलमानच्या 'सिकंदर' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाच्य अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

सलमानच्या 'सिकंदर' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्यांनाही पसंती मिळत आहे. या सिनेमात सलमानसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. ईदच्या मुहुर्तावर सलमानचा हा सिनेमा येत्या ३० मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्य अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

'सिकंदर' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासूनच सलमानच्या या सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग जोरदार सुरू आहे. अॅडव्हान्स बुकिंग सुरू होऊन ३ दिवस झाले आहेत. आणि या तीन दिवसांत तब्बल १.४७ लाख तिकिटे विकली गेली आहेत. 'सिकंदर' सिनेमाच्या प्रदर्शनाच्या दिवसाबरोबरच दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचे शोजही हाऊसफूल झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'सिकंदर' सिनेमाने आत्तापर्यंत ४.३० कोटींची कमाई अॅडव्हान्स बुकिंगमधूनच केली आहे. 

सलमान खानचा 'सिकंदर' सिनेमा हा एक बिग बजेट सिनेमा आहे. २०० कोटी बजेटमध्ये हा सिनेमा बनला आहे. या सिनेमात सलमान आणि रश्मिकासह सत्यराज, काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतीक बब्बर, अंजिनी धवन अशी स्टारकास्ट आहे. पहिल्या दिवशी सलमानचा सिनेमा ६० कोटींचं कलेक्शन करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

टॅग्स :सलमान खानरश्मिका मंदाना