Join us

सिद्धार्थचे ठुमके

By admin | Updated: May 16, 2015 23:20 IST

‘छम छम करता हैं ये नशिला बदन’ या आनंद घेता येणाऱ्या आयटम साँगने मराठी चित्रपटसृष्टीत क्रांती आणली. तोपर्यंत मराठी चित्रपटात आयटम साँग ही संकल्पनाच आली नव्हती.

‘छम छम करता हैं ये नशिला बदन’ या आनंद घेता येणाऱ्या आयटम साँगने मराठी चित्रपटसृष्टीत क्रांती आणली. तोपर्यंत मराठी चित्रपटात आयटम साँग ही संकल्पनाच आली नव्हती. ‘अगं बाई अरेच्चा’मधील हे गाणं घराघरात पोहोचलं. त्यामुळे ‘अगं बाई अरेच्चा २’मध्ये असे काही बघायला मिळेल का, असे कुतूहल रसिकांमध्ये होते. या चित्रपटात आयटम साँग नसून, 'आयटम बॉय’ मात्र बघायला मिळणार आहे. हल्ली लग्नाच्या कार्यक्रमात सिनेतारे-तारकांना सुपारी देऊन सादरीकरणासाठी पाचारण केले जाते. हाच ट्रेंड या चित्रपटात प्रतिबिंबित झालेला पाहायला मिळतो. आणि चक्क लग्नाच्या कार्यक्रमात नाचण्याची सुपारी अभिनेता सिद्धार्थ जाधवला देण्यात आली आहे.