Join us

सिद्धार्थ कॅटरिनाची जमणार जोडी

By admin | Updated: October 24, 2014 03:11 IST

‘स्टुडंट आॅफ द इअर’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा सिद्धार्थ मल्होत्रा तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

‘स्टुडंट आॅफ द इअर’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा सिद्धार्थ मल्होत्रा तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. कॅटरिना कैफसोबत काम करण्याची त्याची सुरुवातीपासूनच इच्छा होती. त्याची ही इच्छा लवकरच पूर्ण होत आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरच्या आगामी चित्रपटात सिद्धार्थ आणि कॅट सोबत दिसणार आहेत. हा चित्रपट एक क्लासिक लव्ह स्टोरी असणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी नित्या मेहरा सांभाळणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग २०१५ मध्ये सुरू होणार आहे. आलिया आणि परिणिती चोप्रासारख्या अभिनेत्रींसोबत अभिनय करणाऱ्या सिद्धार्थची जोडी कॅटरिनासोबत कशी जमते, ते हा चित्रपट रिलीज झाल्यावरच कळू शकेल.