Join us

सिद्धार्थने साजरा केला ओनम दुबईमध्ये

By admin | Updated: September 17, 2016 01:34 IST

सिद्धार्थ मेनन मराठी चित्रपटांमध्ये झळकला आहे. तो अस्खलित मराठी बोलत असल्याने तो महाराष्ट्रीयन असल्याचाच अनेकांचा समज आहे

सिद्धार्थ मेनन मराठी चित्रपटांमध्ये झळकला आहे. तो अस्खलित मराठी बोलत असल्याने तो महाराष्ट्रीयन असल्याचाच अनेकांचा समज आहे. पण सिद्धार्थ हा दाक्षिणात्य असून त्याने काल ओनम हा सण त्याच्या पत्नीसोबत दुबईत साजरा केला. याविषयी सिद्धार्थ सांगतो, ‘‘मी सध्या माझ्या पत्नीसोबत दुबईत आहे. लग्नानंतर हा आमचा पहिला ओनम आहे. त्यामुळे हा आमच्यासाठी खूप स्पेशल होता. माझी आत्यादेखील दुबईतच राहते. आम्ही सगळ्यांनी मिळून ओनम साजरा केला. माज्या आत्याने आणि काकांनी सगळे पारंपरिक जेवण बनवले होते. जेवणासोबत आम्ही पेहरावदेखील पारंपरिकच केला होता. मी धोती आणि कुर्ता घातला होता तर पोर्णिमाने साडी घातली होती. जेवण अतिशय टेस्टी झाले होते. त्यामुळे आम्ही जेवणावर मस्त ताव मारला. केळीच्या पानावर जेवायचा आनंद काही वेगळाच असतो. पायासम तर खूपच छान झाले होते. आम्ही सगळे इतके जेवलो की, जेवल्यानंतर मला उठता येत नव्हते. आधी आम्ही काही जणांनी जेवून घेतले आणि आमचे जेवण झाल्यावर ज्यांचे जेवायचे शिल्लक होते. त्यांना आम्ही वाढले. भारतात नसूनही हा सण मी खूप उत्साहात साजरा केला.’’