कलाकार हा नेहमी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला एकाच प्रकारच्या भूमिकेत अडकायचे नसते. त्यामुळे मराठी कलाकार बॉलीवूड, रंगभूमी, मराठी म्युझिक व्हिडीओ, दाक्षिणात्य चित्रपट यांसारख्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळतात. अभिनेता सिद्धार्थ मेनन आता एका हिंदी अल्बममध्ये झळकणार आहे. या पूर्वी या अभिनेत्याने पोस्टर बॉइज, अँड जरा हटके यांसारख्या मराठी चित्रपटात काम केले आहे. जियरा या त्याच्या अल्बमची गाणी सुस्मिरता डवाळकरने गायली आहेत. या अल्बमविषयी ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना सिद्धार्थ सांगतो, ‘या माझ्या पहिल्या हिंदी अल्बमचे आम्ही केवळ एकाच दिवसात चित्रीकरण पूर्ण केले. याचे चित्रीकरण करताना खूप मजा आली. या अल्बममध्ये माझ्यासोबत निशिगंधा कानूरकर आहे. याचे चित्रीकरण आम्ही औरंगाबाद आणि दौलताबाद येथे केले आहे.’
सिद्धार्थ मेनन झळकणार हिंदी अल्बममध्ये
By admin | Updated: September 8, 2016 03:32 IST