गेल्या काही दिवसांपासून महानगर गॅसच्या नावाने फेक कॉल/मेसेज येत आहेत. सेलिब्रिटीसोबतही हा फ्रॉड होत आहे. आधी चिन्मय मांडलेकर नंतर ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर त्यांना आलेला अनुभव सांगितला. तर आता सिद्धार्थ चांदेकरलाही महानगर गॅसचा फेक कॉल आला होता. मात्र सिद्धार्थने उलट त्या फेक कॉल करणाऱ्याचीच मजा घेतली. त्याला मराठी गाण्याच्या काही ओळी बोलायला सांगितल्या. सिद्धार्थचा मजेशीर व्हिडीओ पाहिला का?
सिद्धार्थ चांदेकरने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कॉलवर असलेला माणूस त्याला म्हणतो, 'मराठी कोई नहीं बोल पाएगा हमारे यहा मराठी की अनुमती नही है'. यावर सिद्धार्थ आश्चर्याने म्हणतो, 'महानगर गॅस... महाराष्ट्र मे गॅस कंपनी जो है वो मराठी की अनुमती नही देते? महानगर? आप एक काम करो..आप मेरे लिए एक मराठी शब्द बोल दो एक वाक्य बोल दो मै तुरंत आपको मेसेज करुंगा. मेरे पिछे बोलिए...स्वर्गात आकाश गंगा , गंगेला सोनेरी काठ...' हे मराठी गाणं म्हणताना हिंदी भाषिक व्यक्तीला ते नीट बोलताच आलं नाही. त्याचे चुकीचे उच्चार ऐकून सिद्धार्थ पोट धरुन हसला.
या व्हिडीओला कॅप्शन देत सिद्धार्थने लिहिले, "महानगर गॅस फ्रॉड कॉल. मजा आली. सोनुरी काठे...झालाला..कुठलीही सरकारी संस्था तुम्हाला व्हॉट्सअॅपवर चॅट करायला सांगत नाही. खूप लोक ह्याला बळी पडत आहेत. सर्वांनी काळजी घ्या आणि त्यांची मजा घ्या."
सिद्धार्थच्या या मजेशीर व्हिडीओवर कलाकारही कमेंट करत हसले आहेत. तसंच नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'आनंदी आनंद','खरंच आनंद झाला' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. सिद्धार्थने मजेशीर व्हिडीओमधून सर्वांना मोठा संदेश दिला आहे.
Web Summary : Siddharth Chandekar turned the tables on a Mahanagar Gas fraud caller. He playfully made the caller recite Marathi song lines, exposing the scam. Chandekar urged everyone to be cautious and have fun with such callers, raising awareness about fraud.
Web Summary : सिद्धार्थ चांदेकर ने महानगर गैस के नाम पर धोखाधड़ी करने वाले कॉल करने वाले को मज़ा चखाया। उन्होंने कॉलर से मराठी गाने की पंक्तियाँ बुलवाईं, जिससे घोटाले का पर्दाफाश हुआ। चांदेकर ने सभी से सावधान रहने और ऐसे कॉल करने वालों के साथ मज़ा लेने का आग्रह किया।