Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिड-जॅकलिन थायलंडमध्ये होणार ‘रिलोडेड’

By admin | Updated: September 14, 2016 04:05 IST

सि द्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर ‘रिलोडेड’ सिनेमाची शूटिंग मलेशियाऐवजी आता थायलंडमध्ये होणार आहे.

सि द्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर ‘रिलोडेड’ सिनेमाची शूटिंग मलेशियाऐवजी आता थायलंडमध्ये होणार आहे. मियामी येथे शूटिंगचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर मलेशिया येथे शूटिंग करण्यात येणार होती; परंतु तेथील प्रशासनाने शूटिंग खर्चामध्ये सवलत देण्यास नकार दिल्यामुळे थायलंडची निवड करण्यात आली. एका महिन्यासाठी संपूर्ण टीम तेथे राहणार आहे. त्यानंतर मुंबईत काही दिवस शूटिंग करून डिसेंबर महिन्यात युरोपमध्ये शेवटचा टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे. युरोपमधील लोकशन्स अजून निश्चित झालेले नाही. ‘रिलोडेड’ हा हृतिक-कॅटच्या ‘बँग बँग’ सिनेमाचा प्रीक्वल असून ‘गो गोवा गॉन’ व ‘हॅपी एंडिग’ फेम राज निदिमोरू आणि कृष्णा डीके हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. ‘बँग बँग’ प्रमाणे हा कोणत्याही हॉलीवूड सिनेमाचा रीमेक नाही.