Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रुतीचा मराठमोळा लूक

By admin | Updated: April 26, 2015 23:44 IST

बॉलीवूडमध्ये विद्या बालन, राणी मुखर्जी, प्रियंका चोप्रा या अभिनेत्रींचा मराठमोळा अंदाज आपण पाहिला आहे. आता ‘गब्बर इज बॅक’ या सिनेमातून श्रुती

बॉलीवूडमध्ये विद्या बालन, राणी मुखर्जी, प्रियंका चोप्रा या अभिनेत्रींचा मराठमोळा अंदाज आपण पाहिला आहे. आता ‘गब्बर इज बॅक’ या सिनेमातून श्रुती हसनचाही मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. श्रुती हसन या चित्रपटात एका मराठी मुलीची भूमिका साकारत आहे. गब्बरच्या निर्मात्यांनीही श्रुतीचे मराठी लूकमधील काही फोटो प्रसिद्ध केले. या फोटोंमध्ये श्रुतीने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे तर नाकात नथही घातली आहे.