Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा-वरुणची केमिस्ट्री!

By admin | Updated: July 3, 2015 01:05 IST

वरुण धवन आणि श्रद्धा कपूरची जोडी हिट असल्याचे सिद्ध होत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘एबीसीडी २’ चाहते पसंत करत आहेत. वरुणने वेगवेगळ्या भूमिका करून फिल्मी पडद्यावर

वरुण धवन आणि श्रद्धा कपूरची जोडी हिट असल्याचे सिद्ध होत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘एबीसीडी २’ चाहते पसंत करत आहेत. वरुणने वेगवेगळ्या भूमिका करून फिल्मी पडद्यावर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. चॉकलेट हीरोपासून ते निगेटिव्ह रोल आणि आता डान्स बेस्ड चित्रपटांतही त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. अभिनय करण्याची जिद्द असेल तर तुम्ही काहीही करू शकता हे त्याने दाखवून दिले आहे. श्रद्धा कपूरही आता वेगवेगळ्या भूमिका करण्यासाठी स्वत:ला तयार करत आहे. या दोघांची चांगली केमिस्ट्री पाहावयास मिळत आहे. श्रद्धा-वरुणमध्ये जवळीक निर्माण होत असल्याने त्यांची केमिस्ट्री जुळत असल्याचे दिसत आहे. आता हा प्रभाव वरुणचा नाही तर काय?