श्रेया घोषाल ही बॉलिवूडमधली सुप्रसिद्ध गायिका आहे. आजवर अनेक गाणी तिने तिच्या आवाजात रेकॉर्ड केली आहेत. बॉलिवूडची ही गायिका केवळ हिंदीच नाही तर मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू, बंगाली, आसामी या भाषांमध्येही गाणी गाते. श्रेयाचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. श्रेयाने रेशमाच्या रेघांनी ही मराठी लावणी गाऊन पुन्हा एकदा चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे.
सध्या श्रेया इंडियन आयडॉल १६ या रिएलिटी सिगिंग शोमध्ये परिक्षकाची भूमिका बजावत आहे. या शोमध्ये अभिनेत्री अरुणा इराणींनी हजेरी लावली होती. यावेळी श्रेयाने "रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी..." ही मराठी लावणी गात सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलं. श्रेयाच्या सुमधूर आवाजातील लावणी ऐकून अरुणा इराणींना यावर ठेका धरायचा मोह आवरता आला नाही. श्रेयाच्या लावणीवर अरुणा इराणींनीही डान्स करत त्यांची अदाकारी दाखवली. शोमधील हा व्हिडीओ सोनी टीव्हीच्या ऑफिशियल सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे.
श्रेया आणि अरुणा इराणींचा हा व्हिडीओ चाहत्यांना आनंद देणारा आहे. एकीकडे गोड गळ्याची गायिका आणि तिच्या लावणीवर ठेका धरणारी सुप्रसिद्ध नायिका असं दृश्य या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. श्रेयाने अनेक मराठी गाण्यांना आवाज दिला आहे. 'अधिर मन झाले', 'बहरला हा मधुमास', 'चंद्रा', 'जीव रंगला', 'आताच बया का बावरलं' ही गाणी श्रेयाने गायली आहेत.
Web Summary : Shreya Ghoshal mesmerized everyone by singing Marathi Lavani on Indian Idol. Aruna Irani danced to the tune of the song. The video shared by Sony TV went viral.
Web Summary : इंडियन आइडल में श्रेया घोषाल ने मराठी लावणी गाकर सभी को मंत्रमुग्ध कर दिया। अरुणा ईरानी गाने की धुन पर थिरकने लगीं। सोनी टीवी द्वारा साझा किया गया वीडियो वायरल हो गया।