Join us
Daily Top 2Weekly Top 5

आगामी चित्रपट फॅनमध्ये श्रीयाचा डेब्यू

By admin | Updated: November 27, 2015 01:59 IST

बॉलीवूडच्या किंग खानसोबत डेब्यू करण्याची संधी मिळणे हे कोणत्याही कलाकारासाठी महत्त्वाची बाब असेल. सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रीया हिला ही उत्तम संधी मिळाली

बॉलीवूडच्या किंग खानसोबत डेब्यू करण्याची संधी मिळणे हे कोणत्याही कलाकारासाठी महत्त्वाची बाब असेल. सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रीया हिला ही उत्तम संधी मिळाली असून तिच्या आनंदाला पारावारच उरला नाही. सचिनला या गोष्टीचा खुपच आनंद झाला आहे. तसेच सचिन म्हणाले,‘ ही काही फार मोठी भूमिका नाही. याशिवाय करिअरसाठी ही खुप मोठी बाब आहे. ती शाहरूखच्या ‘फॅन’ या चित्रपटात पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. यात शाहरूख डबल रोल मध्ये दिसेल. एक रोल सुपरस्टार आणि दुसरा त्याच्या मोठ्या फॅनचा. दोन्ही रोलमध्ये तो स्वत: दिसणार आहे. याशिवाय चित्रपटात आणखी काही नवीन पहावयास मिळेल. सचिनने त्याच्या मुलीला त्याच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांकडून काहीतरी शिकण्यास सांगितले.