Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा म्हणते, ‘कुणाचीही स्टाईल कॉपी करू नका’

By admin | Updated: March 21, 2016 02:06 IST

अभिनेत्री श्रद्धा कपूरला वाटते की, ‘कुणाच्याही दबावाखाली येऊन आपण स्टाईल करू नये किंवा कुणाचीही कॉपी करू नये. स्वत:च्या मनाला जे वाटते किंवा स्वत:ला जे आवडते तेच करावे

अभिनेत्री श्रद्धा कपूरला वाटते की, ‘कुणाच्याही दबावाखाली येऊन आपण स्टाईल करू नये किंवा कुणाचीही कॉपी करू नये. स्वत:च्या मनाला जे वाटते किंवा स्वत:ला जे आवडते तेच करावे.’ एका हेअर रिमूव्हल क्रीम ब्रँडच्या उद्घाटनासाठी श्रद्धा कपूर आली होती. तेव्हा ती म्हणाली, ‘कोणत्याही मुला-मुलीवर स्टाईल करण्यासाठी सामाजिक दबाव असू नये. तुम्ही तुमच्या मनाला जे आवडते तेच करा. तुम्ही कोणता ब्रँड वापरू इच्छिता हे तुमच्यावर अवलंबून असते. तुम्ही एकदा तो ब्रँड वापरायला सुरुवात केली की दुसऱ्यांनी तुमची कॉपी करावी. तुम्ही कुणाचीही कॉपी करू नका.’ श्रद्धा आगामी ‘बाघी’ चित्रपटात दिसणार आहे.