Join us
Daily Top 2Weekly Top 5

तर डॉक्टर बनली असती श्रद्धा कपूर...!

By admin | Updated: November 15, 2016 11:50 IST

अभ्यासात हुशार असणा-या श्रद्धाने अभिनेत्रीऐवजी डॉक्टर बनावे अशी तिच्या पालकांची इच्छा होती

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - आशिकी २, एक व्हिलन, बागी, एबीसीडी २, यासारख्या अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाची आणि गाण्याची झलक दाखवणारी श्रद्धा कपूर ही बॉलिवूडची एक आघाडीची अभिनेत्री असून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रॉक ऑन २' चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतुकही झाले. मात्र लुक्स, आणि अभिनयाने सर्वांच्या मनावर भुरळ घालणारी श्रद्धा अभिनेत्री नव्हे तर डॉक्टर बनावी अशी तिच्या पालकांचीच इच्छा होती. अभिनेते शक्ती कपूर आणि शिवांगी कपूर या दोघांनाही श्रद्धाने अभिनयाच्या क्षेत्रात न जाता डॉक्टर बनावं, असं वाटत होतं. 
 
'श्रद्धा लहानपणापासूनच खूप हुशार होती. ती वर्गातही नेहमी पहिली यायची. त्यामुळे मला आणि तिच्या बाबांना (शक्ती कपूर) वाटायचं की तिने डॉक्टर बनावे. पण श्रद्धाला मात्र अभिनयातच रस होता आणि तिने तेच क्षेत्र निवडले'  असे श्रद्धाची आई शिवांगी यांनी सांगितले. ' आज तिने मिळवलेल्या यशाबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो. ती नेहमीच नवीन गोष्टी शिकण्यावर भर देत असते, आम्हाला तिचा गर्व वाटतो' असेही त्यांनी नमूद केले.