Join us

फुलराणीची भूमिका साकारणार श्रद्धा कपूर

By admin | Updated: April 26, 2017 15:02 IST

भारताची फुलराणी सायना नेहवालच्या जीवनावर आधारित चित्रपट लवरच येणार आहे. या चित्रपटात बॅडमिंटनपटू सायना नेहवालची भूमिका अभिनेत्री श्रद्धा कपूर साकारणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - भारताची फुलराणी सायना नेहवालच्या जीवनावर आधारित चित्रपट लवरच येणार आहे. या चित्रपटात बॅडमिंटनपटू सायना नेहवालची भूमिका अभिनेत्री श्रद्धा कपूर साकारणार आहे. 
"सायना" असे या चित्रपटाचे नाव असून श्रद्धा कपूरने आपल्या ट्विटर अकाउन्टवर सायनाचा फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. सायनाची भूमिका करण्याची संधी मिळाल्यामुळे खूप खुश सांगत सायना नेहवाल - माजी नंबर वन बॅटमिंटनपटू , एक भारतीय मुलगी, लाखो लोकांची प्रेरणा, सर्व युवांची एक आदर्श, असे श्रद्धा कपूरने ट्विट केले आहे. तसेच, आत्तापर्यंतच्या सर्व चित्रपटांपैकी "सायना" हा चित्रपट माझ्यासाठी आव्हानात्मक असणार असल्याचेही श्रद्धा कपूरने म्हटले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करणार आहेत.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहिण हसीना पारकर हिच्या जीवनावर आधारित असलेल्या "हसीना : द क्‍वीन ऑफ मुंबई" या चित्रपट सुद्धा हसीनाची भूमिका श्रद्धा कपूर साकारत आहे.