Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा-अर्जुनच्या 'हाफ गर्लफ्रेंड'चं पहिलं पोस्टर रिलीज

By admin | Updated: March 28, 2017 13:58 IST

श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांची फ्रेश जोडी असलेला आणि गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला 'हाफ गर्लफ्रेंड' सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 28 - श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांची फ्रेश जोडी असलेला आणि गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला 'हाफ गर्लफ्रेंड' सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 'दोस्त से ज्यादा, गर्लफ्रेंड से कम',अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे.  
या पोस्टरमध्ये श्रद्धा आणि अर्जुन पावसात एकत्र भिजत असून त्यांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले आहेत. या रोमँटिक फोटोमुळे सिनेमाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.   
 
प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे. मोहित सूरीने ‘हाफ गर्लफ्रेण्ड’चं दिग्दर्शन केलं आहे. 19 मे रोजी हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.  
 
या आधी मोहित सूरीने श्रद्धासोबत ‘आशिकी - 2’ सारखा सुपरहिट सिनेमा केला आहे. हाफ गर्लफ्रेण्डमध्ये अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत असून सुमारे दोन वर्षांनंतर त्याचा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
 
अर्जुन कपूरने याआधी सिनेमाच्या सेटवरील काही फोटो ट्विटरवर शेअर केले होते.