Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्कर अवॉर्ड प्रेझेंट करण्यापूर्वी प्रियांका चोप्रानं मारला तकिलाचा शॉट

By admin | Updated: March 3, 2016 14:28 IST

ऑस्कर अवॉर्ड्सच्या वेळी हॉलीवूडमधल्या दिग्गजांची मांदियाळी होती. त्यामध्ये सगळ्यात लक्ष वेधून घेत होता प्रचंड लोकप्रियता वाढलेला जिमी किमेल लेट नाईट टॉक शोचा सादरकर्ता गिलेरमो

ऑस्कर अवॉर्ड्सच्या वेळी हॉलीवूडमधल्या दिग्गजांची मांदियाळी होती. त्यामध्ये सगळ्यात लक्ष वेधून घेत होता प्रचंड लोकप्रियता वाढलेला जिमी किमेल लेट नाईट टॉक शोचा सादरकर्ता गिलेरमो. त्याला अकादमी अवॉर्ड मिळाल्यावर त्यानं सगळ्या दिग्गजांच्या उपस्थितीत आणि साथीनं तकिलाचा शॉट पित आनंद साजरा केला आणि त्या सगळ्या सेलेब्जनी पण तकिलाचा आस्वाद घेतला. तकिला हे मेक्सिकन मद्य आहे.
प्रथमच अकादमी अवॉर्ड देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या प्रियांका चोप्रानेही गिलेरमोचं अभिनंदन करताना तकिलाचा शॉट मारला.
विशेष म्हणजे अवॉर्ड प्रेझेंट करायला जाण्यापूर्वी मलाही लिक्विड करेजची गरज होती असं सांगत तकिलाच्या त्या शॉटचा फायदा झाल्याचं म्हटलं आहे.
तकिला घेतल्यानंतर इट्स रियल तकिला म्हणत, मदिरेची तारीफही तिनं केली आहे.
 
प्रियांका चोप्राचा तकिला शॉट घेतानाचा व्हिडीयो...