होय, ऐकता ते खरे आहे. अजय देवगण याचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ह्यशिवायह्णच्या पोस्टर्सनी सगळ्यांचीच उत्सूकता वाढवली आहे. सोशल मीडियावरील शिवायचे पोस्टर्स, स्टिल आणि अजयचे पोस्ट पाहून सगळेच या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. पण आता एक गुड न्यूज म्हणजे..ह्यशिवायह्णचे एक नव्हे, दोन नव्हे तर एका पाठोपाठ एक असे तीन ट्रेलर येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ आॅगस्टला ह्यशिवायह्णचे पहिले ट्रेलर रिलीज होईल. यानंतर ९ आॅगस्टला दुसरे आणि १० आॅगस्टला तिसरे ट्रेलर जारी केले जाईल. आता तीन तीन ट्रेलर म्हटल्यानंतर प्रेक्षक जाम खूश आहेत. येत्या दिवाळीत करण जोहरचा ह्यये दिल है मुश्किलह्णव ह्यशिवायह्ण यांचा बॉक्सआॅफिसवर संघर्ष पाहायला मिळणार आहे. कदाचित तीन-तीन ट्रेलर याच लढाईच्या तयारीचा भाग असावेत!!
शिवायचे एक नाही तीन ट्रेलर!
By admin | Updated: July 4, 2016 00:49 IST