Join us

एका फोटोमुळे शिल्पाच्या ‘प्रेग्नंसी’चा बोभाटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 02:42 IST

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नेहा धूपिया हिच्या प्रेग्नंसीच्या बातम्या मीडियाच्या गॉसिप्स सेक्शनमध्ये दिसल्या.

मुंबई-  काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नेहा धूपिया हिच्या प्रेग्नंसीच्या बातम्या मीडियाच्या गॉसिप्स सेक्शनमध्ये दिसल्या. आता नेहानंतर आणखी एका अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीच्या बातम्या जोरात आहेत. होय, ही अभिनेत्री आहे शिल्पा शेट्टी. शिल्पा शेट्टीला एक सहा वर्षांचा मुलगा आहे. या मुलापाठी शिल्पा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आणि मग सगळा सोशल मीडियाने ही चर्चा चवीने चघळली. अर्थात, याला कारणीभूत ठरला तो शिल्पाचा एक फोटो. या फोटोत शिल्पा एका पॅथॉलॉजी लॅबमधून बाहेर येताना दिसली. शिल्पाचा हा फोटो पाहताक्षणीच व्हायरल झाला आणि पाठोपाठ शिल्पा दुसºयांदा प्रेग्नंट असल्याची चर्चाही सुरू झाली. केवळ इतकेच नाही तर यावरून इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्सही व्हायरल झालेत.