Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीमुळे ट्रोल झाली शिल्पा शिंदे,अशी उडवली जाते खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 10:39 IST

कधी आपले ग्लॅमरस फोटो ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.तिच्या या फोटोंना नेटीझन्स खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही देताना दिसतात. 

सेलिब्रेटी नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात.ब-याचदा ट्विटरवर ट्रोल करुन या सेलिब्रिटींच्या अशा वागण्याबाबत नेटीझन्स नाराजी व्यक्त करताना दिसतात. आता शिल्पा शिंदेवर नेटीझन्स नाराज झाले आहेत. आता शिल्पा चर्चेत यायचं कारण म्हणजे हा फोटो.'भाभीजी घर पर है' मालिका सोडल्यानंतर शिल्पा जवळ कोणते काम नव्हते. मालिका सोडल्यामुळे वेगवेगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीत ती अडकत होती. त्याचदरम्यान तिला बिग बॉसची ऑफर आली आणि तिने ही संधी स्विकारत बिग बॉसच्या घरात एंट्री केली.बिग बॉस-11'च्या शेवटच्या टप्प्यात तिच्या आईची झालेली एंट्री,तिच्या लग्नावरुन उठलेला वाद यामुळे शिल्पा शिंदेच 'बिग बॉस-11'चे जेतेपद पटकावणार याची जोरदार चर्चा रंगली होती आणि अखेर तसंच घडलं.बिग बॉस-11नंतर शिल्पा शिंदेची चर्चा अजूनही सुरुच आहे. 

'बिग बॉस सिझन 11'मुळे तिचे नशीबच पालटले आणि ख-या अर्थाने तिच्या करिअरला एक नवीन वळण मिळाले. सध्या वेगवेगळ्या कामात शिल्पा बिझी असते. त्याचदरम्यान ती सोशल मीडियावरही खूप अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांशी संवादही साधत असते. कधी आपले ग्लॅमरस फोटो ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.तिच्या या फोटोंना नेटीझन्स खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही देताना दिसतात. 

तर दुसरीकडे तिच्या वेगेवगळ्या अंदाजातील फोटोंची खिल्ली उडवण्यात येते.आता पुन्हा शिल्पा शिंदे तिच्या एका सेल्फी फोटोमुळे ट्रोल होत आहे. नुकताच तिने शेअर केलेल्या फोटोत ती एक डोळा मारताना दिसते. तर तिचा हा फोटो शेअर होताच खिल्ली कमेंटस  उडवणारे आणि विनोदांचा भडिमार सुरु आहे. अतिशय असभ्य अशा नेटिझन्सच्या कमेंटस पाहून शिल्पा अशांना चोख उत्तर कधी देणार असे प्रश्नही तिला विचारले जात आहे.शिल्पाने असे फोटो शेअर करत स्वतःचंच हसू करुन घेतलं आहे." अशाप्रकारचे बरेच कमेटंस सध्या पाहायला मिळत आहे 

टॅग्स :शिल्पा शिंदे