शिल्पा शिंदेकडे सध्या कुठलेही काम नाही. पण आपल्या उलटसुलट वक्तव्यांमुळे चर्चेत राहण्याचे काम मात्र ती चोख बजावतेय. चर्चेत येण्याची एकही संधी शिल्पा सोडत नाही. ताजे प्रकरणही असेच. शिल्पाने संधी साधली आणि वादात सापडली. होय, शिल्पा शिंदेने नवज्योत सिंग सिद्धूची पाठराखण केली. यानंतर काय होणार, लोक अक्षरश: तिच्यावर तुटून पडले. सोशल मीडियावर ती प्रचंड ट्रोल झाली. इतकेच नाही तर काहींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. एका युजरने तर सगळी हद्द पार करत, शिल्पाला रेपची धमकी दिली. अर्थात जीवे मारण्याची व रेपची धमकी देणाºयांना शिल्पानेही सडेतोड उत्तर देत, कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.
नवज्योत सिंग सिद्धूची पाठराखण करणा-या शिल्पा शिंदेला रेपची धमकी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 15:02 IST
शिल्पा शिंदेकडे सध्या कुठलेही काम नाही. पण आपल्या उलटसुलट वक्तव्यांमुळे चर्चेत राहण्याचे काम मात्र ती चोख बजावतेय. चर्चेत येण्याची एकही संधी शिल्पा सोडत नाही.
नवज्योत सिंग सिद्धूची पाठराखण करणा-या शिल्पा शिंदेला रेपची धमकी!
ठळक मुद्देआता शिल्पा काय बोलली तर तिने नवज्योत सिंग सिद्धू व पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी गैर ठरवली.