Join us
Daily Top 2Weekly Top 5

सही पकड़े हैं...! ‘अंगुरी भाभी’ शिल्पा शिंदेचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 10:21 IST

‘बिग बॉस 11’ची विजेती शिल्पा शिंदे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय चेहरा आहे. आता मराठमोळी शिल्पा लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवतेय.

ठळक मुद्दे‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत शिल्पा शिंदेने साकारलेली अंगूरी भाभीची भूमिका प्रचंड लोेकप्रिय झाली होती. निर्मात्यांसोबतच्या वादामुळे शिल्पाने ही मालिका मध्येच सोडली होती.

‘बिग बॉस 11’ची विजेती शिल्पा शिंदे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय चेहरा आहे. आता मराठमोळी शिल्पा लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवतेय. होय, आनंद चव्हाण यांच्या ‘अबलाख’ या मराठी चित्रपटातून शिल्पा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय. साहजिकचं शिल्पा कमालीची उत्सूक आहे. 

एका ताज्या मुलाखतीत शिल्पाने ही उत्सुकता बोलून दाखवली. माझी मातृभाषा मराठी आहे. पण मराठी चित्रपटसृष्टीतील फार कमी लोकांना ओळखते. आनंद चव्हाण यांनी माझा फोन नंबर मिळवून मला कॉल केला आणि मला मराठी चित्रपटात काम करणार का, असे विचारले, तेव्हा खरोखरचं मला आश्चर्याचा धक्का बसला. आधी मी संभ्रमात होते. पण त्यांनी चित्रपटाची स्टोरी ऐकवली आणि मी फोनवरचं या चित्रपटासाठी होकार दिला. मी लगेच होकार दिलेला बघून, ‘आप शिल्पा शिंदेही बोल रही है ना?’, असे आनंद यांनी मला विचारले. यावर होय, तुम्ही योग्य व्यक्तिला फोन केला, असे मी त्यांना म्हणाले. पहिला मराठी चित्रपट करताना निश्चितपणे मी उत्सुक आहे, असे शिल्पा म्हणाली.

शिल्पाच्या या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटाबद्दल सांगायचे तर, या चित्रपटात ती राकेश बापटसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. आधी या चित्रपटासाठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेशी संपर्क साधण्यात आला होता. खुद्द प्रार्थनाने या वृत्ताला दुजोरा दिला होता. शिल्पाला याबद्दल छेडले असता, शिल्पाने नेहमीप्रमाणे बेधडक उत्तर दिले. होय, प्रार्थनाला आधी या चित्रपटाची आॅफर दिली गेली होती. पण तिच्या तारखांचा घोळ होता. पण खरे सांगायचे तर मला त्याने काहीही फरक पडत नाही. मी करणार असलेला प्रोजेक्ट हाच माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यापुढे सगळ्या गोष्टी मी गौण मानते. त्यामुळेच चांगल्या प्रोजेक्टसाठी प्रतीक्षा करण्याचा संयम माझ्यात आहे, असे ती म्हणाली.

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत शिल्पा शिंदेने साकारलेली अंगूरी भाभीची भूमिका प्रचंड लोेकप्रिय झाली होती. निर्मात्यांसोबतच्या वादामुळे शिल्पाने ही मालिका मध्येच सोडली होती. यानंतर तिच्या जागी शुभांगी अत्रेची वर्णी लागली होती. ‘भाभीजी घर पर है’सोडल्यानंतर शिल्पा शिंदे ‘बिग बॉस11’मध्ये दिसली. केवळ दिसलीच नाही तर हा शो तिने जिंकला.

टॅग्स :शिल्पा शिंदे