Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेवंताच्या फोटोकडे पाहात अपूर्वा म्हणाली... "या बाईनं माझं आयुष्य बदललं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 16:04 IST

अपूर्वाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

रात्रीस खेळ झाले या स्मॉल स्क्रिनवरील मालिकेला पहिल्या पर्वापासून प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांच भरभरुन प्रेम मिळालं.. मालिकेचं नवं सीजन आल्यानंतर अगदी अण्णा नाईकांपासून ते सुषल्यापर्यंतच्या प्रत्येक पात्राची चर्चा पाहायला मिळतंय..

नुकतीच या मालिकेतील शेवंताची अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची पोस्ट असंच काहीस सांगून जाणारी आहे.अपूर्वानं इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे.  ज्यात मागे भिंतीवर शेवंताच्या काही पेटींग्स लावलेल्या दिसतायेत आणि फोटोंकडे बघत अपुर्वा  म्हणतेयं..या बाईनं माझं आयुष्य बदललं. या पोस्टमागचं कारण म्हणजे..अपूर्वानं जेव्हा स्मॉल स्क्रिनवर शेवंता म्हणून एन्ट्री घेतली तेव्हा पासूनच तिच्या दमदार अभिनयाचं आणि लूकचं प्रेक्षकांकडून भरपूर कौतुक झालं..

एवढंच काय तर रात्रीस खेळ चाले मालिकेचा तिसरा सीजन येतोय हे फॅन्सना कळताच .. लाडकी शेवंता या नव्या सीजनमध्ये सुद्धा दिसणार का अशी एकच चर्चा पाहायला मिळाली. अपूर्वा  शेवंता या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. शेवंता या भूमिकेनंतर 'तुझ माझं जमतंय' या सिरीअलमधून पम्मीच्या रुपात आपल्याला दिसली.आता ही मालिका सुरू होऊन काही महिनेच झाले असताना अचानक अपूर्वाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :अपूर्वा नेमळेकररात्रीस खेळ चाले ३