Join us

'शेवंताबाईची शेवंताताई झाली'; अपूर्वाचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 19:00 IST

Apurva nemlekar: 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत अपूर्वाने शेवंता ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने बरंच वजन वाढवलं होतं. परंतु, आता अपूर्वाने तिच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.

झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका बरीच गाजली. गुढ कथानक असलेल्या या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला. त्यातही शेवंता या भूमिकेने तर प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं.  ही भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (apurva nemlekar) हिने साकारली होती. सध्या सोशल मीडियावर अपूर्वाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तिचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झाल्याचं दिसून येत आहे.

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत अपूर्वाने शेवंता ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने बरंच वजन वाढवलं होतं. परंतु, आता अपूर्वाने तिच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. अपूर्वा तिच्या डाएटकडे आणि वर्कआऊटकडे कटाक्षाने लक्ष देत असून तिची ही मेहनत दिसून येत आहे.

अलिकडेच अपूर्वाने इन्स्टाग्रामवर तिचे वर्कआऊट करतांनाचे काही फोटो शेअर केले. या फोटोमध्ये तिच्या लूकमध्ये झालेला बदल स्पष्टपणे दिसून येत आहे. तिचं हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चाहत्यांनादेखील आवडलं असून त्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.

काय म्हणाले नेटकरी?

'शेवंता बारीक झाली रे !', 'शेवंताबाईची शेवंताताई झाली', 'काय खतरनाक बदल झालाय....', 'बारीक झाली आहेस मस्त', अशा कितीतरी कमेंट करत नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

टॅग्स :अपूर्वा नेमळेकरटेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी