टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने २ सप्टेंबरला जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे त्याचे निधन झाले. त्याच्या निधनाला दोन आठवड्यांहून जास्त काळ उलटला आहे. मात्र त्याचे चाहते अद्याप या धक्क्यातून सावरलेले नाहीत. दरम्यान शेहनाज गिलसाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}}नुकताच शेहनाज गिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे, ज्यात ती खूप दुःखी दिसते आहे. या व्हिडिओमध्ये शेहनाज गिल एक पंजाबी गाणे गाताना दिसते आहे. या व्हिडिओत चाहते सतत कमेंट करत आहेत. तिने खंबीर राहिले पाहिजे, शेहनाज गिलचा हा व्हिडिओ कधीचा आहे? याबद्दल काहीच माहीत नाही, पण शेहनाजचा हा व्हिडिओ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतरचा असल्याचा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत.
सिद्धार्थवर अंत्यविधी सुरु असताना शेहनाज गिल स्वत:ला सांभाळू शकली नव्हती. ती अगदी जमिनीवर कोसळली होती. शेहनाजचा हा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तिच्या चेहऱ्यावर सिद्धार्थ दूर गेल्याचे दु:ख स्पष्टपणे दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
‘बिग बॉस १३’च्या घरात सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची रोमॅंटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यानंतर या जोडीला ‘सिडनाज’ या नावाने चाहते ओळखू लागले होते. सिद्धार्थ आणि शहनाज यांच्या मैत्रीची सतत सोशल मीडियावर चर्चा होत असे. सिद्धार्थ व शहनाज लवकरच लग्न करणार होते, अशीही चर्चा होती. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थने शहनाजसोबत 'डान्स दिवाने ३' या शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी शहनाजने सिद्धार्थसोबत केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. सिद्धार्थने यावेळी माधुरी दीक्षितसोबतही स्टेजवर डान्स केला होता.