Join us  

Siddharth Shukla Birth Anniversary : 'मी तुला पुन्हा भेटेन..' सिद्धार्थच्या आठवणीत शहनाझची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 9:11 AM

२ सप्टेंबर २०२१ रोजी सिद्धार्थचे कार्डिआक अरेस्टने निधन झाले. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते भावूक झाले आहेत.

Siddharth Shukla Birth Anniversary : बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे अचानक जग सोडून जाणे सर्वांनाच चटका लावून गेले. २ सप्टेंबर २०२१ रोजी सिद्धार्थचे कार्डिआक अरेस्टने निधन झाले. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते भावूक झाले आहेत. तर सिद्धार्थची अगदी जवळची व्यक्ती शहनाझ गिलने (Shehnaaz Gill) सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत. 

शहनाझ आणि सिद्धार्थची जोडी (sidnaaz) सिडनाझ नावाने प्रसिद्ध होती. बिग बॉस १३ मध्ये त्यांची बॉंडिंग पाहून लाखो लोक सिडनाझचे चाहते झाले होते. मात्र बॉग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर काही दिवसातच सिद्धार्थला अचानक हृदयविकाराचा धक्का आला आणि काही कळायच्या आत सिद्धार्थ हे जग सोडून निघून गेला होता. यानंतर शहनाझची झालेली अवस्था कोणालाच बघवणारी नव्हती. आता शहनाझने काम करायला सुरुवात केली आहे पण तिच्या बोलण्यात नेहमी सिद्धार्थचा उल्लेख येतोच. आज त्याच्या जन्मदिनी तिने काही फोटो पोस्ट करुन सिद्धार्थच्या आठवणींना उजाळा दिला आहे.'मी तुला परत नक्की भेटेन असे तिने कॅप्शन दिले आहे.'

शहनाझचा अल्लडपणा आणि सिद्धार्थचे तिला सांभाळून घेणे, दोघांमधली भांडणं, प्रेम हे सर्वच चाहत्यांनी बिग बॉसमध्ये पाहिलं. त्यामुळे सिद्धार्थ हा खूप प्रतिभावान अभिनेता होता. गुड लुकिंगही होता.तंदुरुस्त होता. कोणताही आजार नाही, अगदी फिट असलेल्या सिद्धार्थच्या जाण्यावर कोणाचाच लवकर विश्वास बसला नाही.

सिद्धार्थने 'बालिका वधू' या मालिकेत केलेली भुमिका प्रत्येकाच्या मनात घर करुन आहे. याशिवाय ब्रो'कन बट ब्युटिफुल' आणि 'दिल से दिल तक' सिरीजमध्ये त्याने काम केले. 'बिग बॉस १३' चा तो विजेता झाला. 'हंप्टी शर्मा की दुल्हनिया' सिनेमातही त्याने काम केले होते.  

टॅग्स :शेहनाझ गिलबिग बॉसइन्स्टाग्रामसोशल मीडिया