Join us

घर आणि करिअरमध्ये अडकली ‘ती’

By admin | Updated: September 7, 2016 02:19 IST

घड्याळ्याच्या काट्यावर फिरणाऱ्या आपल्या आयुष्यात घर आणि करिअर यात ताळमेळ कसा घालावा हे एक मोठं आव्हान प्रत्येकासमोर असते.

घड्याळ्याच्या काट्यावर फिरणाऱ्या आपल्या आयुष्यात घर आणि करिअर यात ताळमेळ कसा घालावा हे एक मोठं आव्हान प्रत्येकासमोर असते. सामान्य स्त्रीप्रमाणचे सिनेअभिनेत्रींनाही घर आणि करियर सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. पप्पी दे पारूला या गाण्याद्वारे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी स्मिता गोंदकर तिच्या आगामी चित्रपटात अशीच एक भूमिका साकारणार आहे. ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’ या चित्रपटामध्ये आपल्याला स्मिता नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात स्मिताचे ‘मिस्टर अनवॉन्टेड’ अभिनेते राजेंद्र शिसतकर आहेत. दुहेरी कुटुंबाचे गणित मांडणारी ही कथा प्रकाश गावडे यांनी लिहिली असून दिग्दर्शन दिनेश अनंत आणि प्रकाश गावडे या जोडीने केले आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाददेखील या दोघांचेच आहेत. एक ताजातवाना विषय निर्माते मितांग भूपेंद्र रावल प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. उर्वी एन्टरप्रायजेस निर्मित आणि दिनेश अनंत दिग्दर्शित ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’ हा चित्रपट येत्या 23 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.