ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - अभिनेता सलमान खान अक्षय कुमारसह एका चित्रपटात काम करणार असल्याचं वृत्त केवळ अफवा असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, अक्षय कुमारसह एका चित्रपटात काम करणार असल्याचं स्वतः सलमानने स्पष्ट केलं आहे.
रविवारी सलमानने ट्विट करून अफवांवर लक्ष देऊ नका असं म्हटलं आहे. ''अफवांवर लक्ष देऊ नका आणि माझं म्हणणं ऐका, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर.. ''असं ट्विट करत अक्षय कुमार सोबत चित्रपट करणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं.
Don't follow rumors . follow me . ek baar jo maine commitment kar di toh phir...... vry much doing film with @akshaykumar— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 12, 2017
या वर्षीच्या सुरूवातीला अक्षय कुमारसह एका चित्रपटात काम करणार असून करण जोहर त्या सिनेमाचा निर्माता असेलं असं सलमानने म्हटलं होतं. हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘रकीब’, ‘जाट एंड जुलियट’ या सिनेमातून नावारूपास आलेला दिग्दर्शक अनुराग सिंह या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.