Join us

शशांक झाला गायक

By admin | Updated: April 17, 2015 23:40 IST

‘होणार सून मी ह्या घरची’ या लोकप्रिय मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या मनात आपली खास प्रतिमा उमटविणारा शशांक केतकर गायक बनला आहे. ‘

‘होणार सून मी ह्या घरची’ या लोकप्रिय मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या मनात आपली खास प्रतिमा उमटविणारा शशांक केतकर गायक बनला आहे. ‘यारा’ या नवीन रोमँटिक ड्यूएट गाण्यासाठी शशांक केतकर आणि गायिका दीपिका दातार यांनी पार्श्वगायन केले असून, या गाण्याचा व्हिडीओ सुद्धा त्याच्यावरच चित्रित करण्यात आला आहे. ‘यारा’ या सुमधुर गाण्याचे शब्द गीतकार वैभव जोशी यांनी लिहिले असून, संगीत जसराज जोशी, सौरभ भालेवर आणि हृषीकेश दातार या त्रिकूटाने दिले आहे.